सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक : शरद पवार

टीम ई-सकाळ
Wednesday, 7 August 2019

सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या.

- शरद पवार.

नवी दिल्ली :  माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, असे त्यांनी ट्विट केले.

हृदयविकाराचा झटका आल्याने सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले, की सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या.

संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushma Swarajs death shocking says Sharad Pawar