क्रौर्याचा कळस! महिलेला आणि तिच्या मित्राला खांबाला बांधून मारलं, पूर्वाश्रमीच्या नवऱ्याचं कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

महिलेला तिच्या मित्राला खांबाला बांधून मारलं, नवऱ्याचं कृत्य

म्हैसूर: प्रेम प्रकरणाच्या (Love affair) संशयावरुन महिलेला आणि तिच्या मित्राला इलेक्ट्रीकच्या खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. महिलेचा पूर्वाश्रमीचा पती आणि दीराने मिळून दोघांना मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. कर्नाटकच्या (Karnataka) म्हैसूर जिल्ह्यातील एका गावात २५ नोव्हेंबरला ही धक्कादायक घटना घडली.

स्थानिक गावकऱ्यासोबत तिचं लग्न झालं होतं. तिला तीन मुलं आहेत. परस्परांशी पटत नसल्यामुळे पती-पत्नी पाच वर्षांपूर्वी वेगळे झाले. महिला तिच्या आई-वडिलांकडे राहते. ३० वर्षीय महिला बांधकाम मजूर म्हणून काम करते. तिची शेजारच्या गावात राहणाऱ्या २४ वर्षीय युवकासोबत मैत्री झाली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

महिलेने २५ नोव्हेंबरला युवकाला घरी चहासाठी बोलावले होते. त्यावेळी मारहाणीचा प्रकार घडला. युवक महिलेच्या घरी आलाय, या बद्दल महिलेचा पूर्वाश्रमीचा पती आणि दीराला समजलं. ते तडक तिच्या घरी धडकले. त्यांनी थेट दोघांवर हल्ला केला. महिलेला आणि तिच्या मित्राला इलेक्ट्रीकच्या खांबाला बांधून मारहाण केली.

दोघांना बराचवेळ मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघांना मारहाण सुरु असताना गावकरी सभोवताली जमले होते. दोघेही मदतीसाठी याचना करत होते. पण कोणीही मदतीसाठी पुढे सरसावले नाही. गावच्या प्रमुखांना याबद्दल समजल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप करुन दोघांची सुटका केली. दुसऱ्या दिवशी या बद्दल बैठक घेऊन त्यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Karnataka