कोलकातामध्ये निपाहमुळे जवानाचा मृत्यू झाल्याचा संशय

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

केरळ मधील एक जवान आपली सुट्टी संपवून कामावार रुजू झाला होता. रविवारी कलकत्त्यातील कमांड हॉस्पीटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. केरळमधून आलेल्या या जवानाचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सिनू प्रसाद असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव असून तो 27 वर्षाचा होता. 

कोलकाता : केरळमधील जवान आपली सुट्टी संपवून कामावर रुजू झाला. रविवारी कोलकातामधील कमांड रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. केरळमधून आलेल्या या जवानाचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सिनू प्रसाद असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव असून ते 27 वर्षाचे होते. 

भारतीय लष्कराच्या पुर्व विभागाने दिलेल्या माहितीनूसार, सिनू प्रसाद यांची कोलकातामधील फोर्ट व्हिल्लीअम येथे नियुक्ती करण्यात आली होती. 20 मे ला त्यांना कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. प्रसाद हे केरळच्या पालक्कड जिल्ह्यातील रहीवासी होते. सुट्टीसाठी अनेक दिवसांपासून ते गावाला गेले होते. मोठ्या सुट्टीनंतर 13 मे ला ते कामावर रुजू झाले होते.   

या जवानाचा मृतदेह पुण्यातील राष्ट्रीय विषाणू परिक्षण संस्था पुणे (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आला आहे. परंतु, हा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे आजूनही स्पष्ट करण्यात आले नाही. एनआयव्ही देशातील एकमेव संस्था आहे जिथे निपाह व्हायरसचे संशोधन सुरू आहे.

 

Web Title: suspicion of Jawan's death due to nipah virus