'ममता खोटारड्या, त्यांचं नामांकन रद्द व्हावं'; प्रतिज्ञापत्रावरुन सुवेंदु अधिकारींचा आरोप

suvendu adhikari.
suvendu adhikari.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि टीएमसीच्या दरम्यान जोरदार खडाजंगी सुरु आहे. नंदीग्राममधून भाजपचे उमेदवार असलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नामांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोप लगावला आहे. सुवेंदु अधिकारी यांनी म्हटलंय की, ममता बॅनर्जी यांनी नामांकन पत्रामध्ये अपराधाच्या प्रकरणांची माहिती दिलेली नाहीये, त्यामुळे त्यांचं नामांकन रद्द केलं जावं.

सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप
नंदीग्राममधून भाजपचे उमेदवार असलेले सुवेंदु अधिकारी हे आधी ममता बॅनर्जी यांचेच निकटवर्तीय होते. सध्या त्यांनी ममता यांची साथ सोडून भाजपचा हाथ धरला आहे. त्यांनी आता ममतांवर आरोप केलाय की त्यांनी नामांकन अर्जामध्ये गुन्ह्याच्या प्रकरणांशी संबंधित माहिती संपूर्णपणे दिली नाहीये. त्यांच्यावर 6 खटले नोंद आहेत ज्याचा त्यांनी नामांकन पत्रात उल्लेख केला नाहीये. यामधील 5 खटले 2018 मध्ये आसाममध्ये दाखल झाले होते. तर आणखी एक खटला सीबीआयकडे प्रलंबित आहे. मात्र, त्यांनी या सर्व खटल्यांची माहिती लपवली आहे. सुवेंदु यांनी म्हटलंय की ममता बॅनर्जी या खोट्या आधारावर उभ्या आहेत आणि त्या देखील खोटारड्या आहेत. सुवेंदू अधिकारी यांचे म्हणणे आहे की ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावरील सहा फौजदारी खटल्यांचा उल्लेख न करता प्रतिज्ञापत्र सादर केले. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे (ईसी) तक्रार दिली आहे, असे सुवेंदु अधिकारी यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

नंदीग्राममध्ये ममता आणि सुवेंदु यांच्या दरम्यान लढा
पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये नंदीग्राम हा मतदारसंघ खूपच चर्चेत आहे. कारण या ठिकाणी प्रमुख लढा हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदु अधिकारी यांच्यात आहे. या जागेवरील विजय आणि पराभव दोन्हीही पक्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 
याआधी नंदीग्राममधूनच नामांकन अर्ज दाखल करताना निवडणुकीचा प्रचार करताना ममता बॅनर्जी या जखमी झाल्या होत्या. यावरुन टीएमसीने आरोप केला होता की, हा हल्ला भाजपने केला आहे. तर भाजपने या घटनेची सीबीआय तपासाची मागणी केली होती. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका 8 टप्प्यांमध्ये होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी होणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com