Swaraj Screening: अमित शहांमध्ये मला सरदार पटेलांचे प्रतिबिंब दिसते - अनुराग ठाकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swaraj Screening: अमित शहांमध्ये मला सरदार पटेलांचे प्रतिबिंब दिसते - अनुराग ठाकूर

Swaraj Screening: अमित शहांमध्ये मला सरदार पटेलांचे प्रतिबिंब दिसते - अनुराग ठाकूर

भारत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात मोठी झेप घेण्यास तयार आहे. याच पार्श्वभूमीवर दूरदर्शनच्या 'स्वराज: भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा'चे विशेष स्क्रीनिंग गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या मालिकेचे 75 भाग बनवण्याचे काम दूरदर्शनने केले आहे. स्वातंत्र्याच्या शूर सुपुत्रांच्या अमर बलिदानाला समर्पित ही मालिका 14 ऑगस्टपासून दूरदर्शनवर हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणार आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अमित शाह यांचे आधुनिक युगातील कुशल रणनीतिकार आणि 'चाणक्य' असे वर्णन केले, ज्यांनी राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करताना कलम 370 आणि 35A मधून मुक्तता मिळवली. ठाकूर म्हणाले, सरदार पटेल यांनी भारताला अखंड ठेवल्याचे आपण ऐकले होते. मला अमित शहांमध्ये सरदार पटेलांचे प्रतिबिंब दिसते. पटेलांनी देश एकसंध ठेवला आणि अमित शहा तो मजबूत करत आहेत.

हेही वाचा: Amit Shah: हजारो वर्षांपासूनची संस्कृती वाचवू शकलो नाही तर, आपण स्वराज्य मिळवू शकू का?

कार्यक्रमावेळी अमित शहा यांनी बोलताना देशाचे भविष्य महान बनवायचे असेल तर भारताच्या महान इतिहासाचा अभिमान तरुण पिढीमध्ये निर्माण केला पाहिजे, तसेच तो जपायला हवा असंही सांगितल.

Web Title: Swaraj Screening I See A Reflection Of Sardar Patel In Amit Shah Anurag Thakur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..