

A mobile app interface displaying hospital information and healthcare services in Varanasi.
esakal
वाराणसी : रुग्णालयांमधील उपचारांच्या नावाखाली होणारी जादा आकारणी रोखण्यासाठी आणि आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी वाराणसी आरोग्य विभागाने ‘स्वस्थ काशी’ हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील १,१४७ नोंदणीकृत रुग्णालये, नर्सिंग होम्स, क्लिनिक्स आणि निदान केंद्रांची माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. रुग्णालयांची नोंदणी, उपचारांचे दर, उपलब्ध बेड, व्हेंटिलेटर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेळांची माहितीही अॅपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. एन. पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅपचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते नागरिकांसाठी उपलब्ध होईल. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप मोफत डाउनलोड करता येणार आहे.