Swiggy Report 2022 : अरे किती खाणार! यंदा भारतात दर सेकंदाला बुक झाल्या बिर्याणीच्या ३ ऑर्डर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swiggy annual report 2022 check top ordered food in india 2022 indians ordered 2 biryanis every second in 2022

Swiggy Report 2022 : अरे किती खाणार! यंदा भारतात दर सेकंदाला बुक झाल्या बिर्याणीच्या ३ ऑर्डर

Most Ordered Food In India 2022 : फूड डिलीव्हरी हा आपल्या दैनंदीन जीवनाचा भाग बनली आहे. जेव्हा कधी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होतो लोक फोन बाहेर काढतात आणि ऑर्डर करतात. मागच्या काही दिवसांमध्ये याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तुम्ही मागवलेले जेवण अगदी काही मिनीटात तुमच्या समोर हजर होतं. लोकांनी दरवर्षी सर्वाधिक मागवलेले खाद्यपदार्थांची यादी वर्षाअखेर जाहीर केली जाते यामध्ये नेहमी प्रमाणे यंदाही बिर्याणी टॉपवर आहे.

स्विगीने त्यांचा वार्षीक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार बिर्याणी यंदा देखील हीट ठरली आङे. चिकन बिर्याणी सलग सातव्यांदा या अॅपवर सर्वाधिक ऑर्डर केला जाणार खाद्यपदार्थ ठरला आहे. देशात या वर्षभरात दर मिनीटाला १३७ बिर्याणीच्या ऑर्डर केल्या गेल्या. याचा अर्थ प्रति सेकंद २.२८ बिर्याणी ऑर्डर केल्या जात होत्या. यावरून भारतीयांचं बिरयानी प्रेम दिसून येतं.

हेही वाचा: Swiggy Report : पुणेकर म्हणतात बॉस हवा तर असा! टीमसाठी एकाच वेळी मागवलं ७१००० रुपयांचं जेवण

चिकन बिर्याणी नंतर स्विगी वर सर्वात जास्त ऑर्डर करण्यात आलेल्या टॉप पांच पदार्थांमध्ये मसाला डोसा, चिकन फ्राईड राइस, पनीर बटर मसाला आणि बटर नान यांचा समावेश होता. रिपोर्ट नुसार, भारतीय पदार्थांसोबत लोकांनी परदेशी पदार्थांना देखील पसंती दिली आहे.

हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

भारतात यंदा पिझ्झा, मॅक्सिकन बाऊल, कोरियन रॅमन आणि इटालियन पास्ता सारख्या डिशेस देखील ऑर्डर करण्यात आल्या. तर रात्री उशीरा लागणाऱ्या भूकेसाठी ऑर्डर करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांबद्दल बोलायचं झालं तर पॉपकॉर्न हा रात्री १० नंतर २२ लाखांपेक्षा अधिक वेळा ऑर्डर करण्यात आलेला पदार्थ ठरला. तर सर्वाचे आवडचे गुलाब जामुन यांना देखील भारतीयांची चांगलीच पसंती मिळाली. २०२२ मध्ये २७ लाख वेळा गुलाम जामुन ऑर्डर करण्यात आलेत.

हेही वाचा: Rahul Gandhi Video :...अरे भावानों देश बघतोय; राहुल गांधींनी माध्यमांच्या प्रतिनिधींचीच घेतली फिरकी

सोमोसे स्विगी वर सर्वाधित ऑर्डर करण्यात आलेला स्नॅक ठरला. डीप-फ्राइड गुडी साठी 40 लाखांहून अधिक ऑर्डर मिळाल्या . पाव भाजी, फ्रेंच फ्रायझ, गार्लिक ब्रेडस्टिक्स आणि हॉट विंग्स यांना देखील खवय्यांची पसंती मिळाली.

रिपोर्टनुसार फूड ट्रेंड जंक फूड हाच होता. मजेशीर बाब म्हणजे स्विगी या ग्रॉसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर ऑर्गेनिक फळे आणि भाज्या तसेचे आरोग्यासाठी चांगले खाद्यपदार्थ मागवणाऱ्या ग्राहकांमध्ये देखील वाढ पाहायला मिळाली आहे.

स्विगी अॅप वर 50 लाख किलोग्राम हून अधिक ऑर्ग्रेनिक फळ आणि भाजांची विक्री झाली. सर्वाधिक हेल्दी जेवण मागवणाऱ्या शहरांमध्ये बेंगळूरू, मुंबई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश होता. स्विगी वर या वर्षी हेल्दी, गिल्ट फ्री फूड सर्चमध्ये 23% वाढ झाली आहे.

टॅग्स :'foodLook back 2022