
Swiggy Report : पुणेकर म्हणतात बॉस हवा तर असा! टीमसाठी एकाच वेळी मागवलं ७१००० रुपयांचं जेवण
Swiggy Annual Report 2022 : आपल्यापैकी बरेच स्वतःसाठी तर कधी मित्र-कुटुंबासाठी हॉटेलमधून जेवण मागवले जाते. यासाठी अन्न डिलीव्हर करणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन ऑर्डर केली जाते. दरम्यान वर्षाखेर अन्न आणि किराणा डिलिव्हरी करणारी कंपनी "स्विगी" ने त्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. यातच पुण्यातील एका व्यक्तीने त्याच्या सहकाऱ्यांसाठी तब्बल ७१ हजारांचे जेवण ऑर्डर केल्याची माहिती समोर आली आहे.
या रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार पुण्यातील एका व्यक्तीने एकाच वेळी त्याच्या स्टाफसाठी तब्बल ७१००० रुपयांचे बर्गर आणि फ्राईज (fries)मागवले आहेत. दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर बॉस असावा असं बोलंलं जात आहे.
हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
दरम्यान पुण्यातील ही व्यक्ती सगळ्यात जास्त किमतीची ऑर्डर देणारा स्विगीचा दुसरा ग्राहक ठरली आहे. तर बेगळूरू मधील एका व्यक्तीने एकाच वेळी ७५,३७८ रुपयांचे दिवाळी दरम्यान जेवण मागवले होते. याच्या पाठोपाठ पुण्यातील व्यक्तीने त्याच्या टीम साठी ७१,२२९ रुपयांचे बर्गर आणि फ्राईज मागवले. आज स्विगी ने त्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला असता ही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Rahul Gandhi Video :...अरे भावानों देश बघतोय; राहुल गांधींनी माध्यमांच्या प्रतिनिधींचीच घेतली फिरकी
या अहवालातील आणखी काही मुद्दे
- भारतात या वर्षी प्रती मिनिट १३७ बिर्याणी ऑर्डर केल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.
- भारतात बिर्याणी नंतर मसाला डोसा, चिकन फ्राईड राइस, पनीर बटर मसाला, बटर नान, व्हेज फ्राईड राईस, व्हेज बिर्याणी आणि तंदुरी चिकन हे पदार्थ सर्वाधिक मागवले गेले आहेत.
- २७ लाख वेळा गुलाबजाम तर १६ लाख वेळा रसमलाई ऑर्डर केली गेली आहे.
हेही वाचा: Pathaan Controversy : 'भगवा' भाजपची खासगी मालमत्ता आहे का? बिकिनी वादात TMCचा हल्लाबोल