Swiggy Instamart Gold Coin Delivery Scam
esakal
Swiggy Instamart Gold Coin Delivery Scam : भारतामध्ये सोन्याची खरेदी ही सण, समारंभ किंवा गुंतवणूक कोणत्याही कारणासाठी असो हमखास केली जाते. तंत्रज्ञानामुळे आता सोनेसुद्धा काही मिनिटांत घरी मागवता येते; पण जर तुम्ही हजारो रुपये देऊन सोने ऑर्डर केले आणि पॅकेट उघडल्यावर आत ५ ग्रॅमचे सोन्याचे नाणे (Gold Coin) न सापडता केवळ १ रुपयाचे नाणे दिसले, तर..? असा अजब प्रकार बंगळूरमधील अंकित दिवाण यांच्या बाबतीत खरोखरच घडला आहे.