

Swiggy Layoffs
esakal
Bengaluru: ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या स्विगीने आपल्या क्विक कॉमर्स व्यवसायातील इन्स्टामार्ट विभागात सुमारे ३४० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट आणि सपोर्ट विभागांतील कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. वाढता तोटा, तीव्र स्पर्धा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वाढता वापर या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.