esakal | वाराणसी : शिवलिंगाच्या प्रतिमेतील 'रुद्राक्ष सेंटर'चं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

Rudraksh Centre

शिवलिंगाच्या प्रतिमेतील 'रुद्राक्ष सेंटर'चं मोदींच्या हस्ते उद्घाटन

sakal_logo
By
अमित उजागरे

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सम्मेलन केंद्राचं (रुद्राक्ष) गुरुवारी उद्घाटन केलं. जपानच्या सहकार्यानं तयार झालेलं हे केंद्र जपान-भारताच्या मैत्रीचं प्रतिक आहे. वाराणसीमध्ये ही योजना सुरु करण्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतीक संवादाची संधी उपलब्ध करुन देणं हे आहे. (Symbol India Japan friendship Modi inaugurates Rudraksha Center Varanasi aau85)

या रुद्राक्ष केंद्रामध्ये भारताचं प्राचीन शहर असलेल्या काशीच्या सास्कृतीक समृद्धीची झलक पहायला मिळते. वाराणसीतील सिगरा भागात २.८७ हेक्टर जमिनीवर तयार करण्यात आलेल्या या दुमजली केंद्रामध्ये १,२०० लोकांच्या बैठकीची क्षमता आहे. या संमेलन केंद्रात अॅल्युमिनिअमने बनलेले १०८ रुद्राक्षही लावण्यात आले आहेत, तर याचं छत शिवलिंगाच्या आकाराचं बनवण्यात आलं आहे. ही संपूर्ण इमारत रात्रीच्यावेळी एलईडी लाईटमध्ये झगमगून जाते.

आंतरराष्ट्रीय संमेलनं, प्रदर्शनं, संगितिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ही योग्य जागा आहे. या केंद्राच्या गॅलरीज भित्ती चित्रांनी सजवण्यात आली आहेत. या केंद्रातील जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून सहकार्य लाभलेल्या 'वाराणसी कन्व्हेन्शन सेंटर'च्या (VCC) मुख्य हॉलला गरज पडल्यास छोट्या भागांमध्ये विभाजीत केलं जाऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या ठिकाणी जपानचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. यावेळी रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरच्या परिसरात पंतप्रधानांनी रुद्राक्षाचं एक झाडंही लावलं.

loading image