T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

BJP Accepts T Raja Singh’s Resignation : जाणून घ्या, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर, पक्षाने टी. राजा यांना पत्राद्वारे काय कळवले आहे.
BJP MLA T Raja Singh seen during his emotional resignation announcement, marking a major shift in Telangana’s political landscape.
BJP MLA T Raja Singh seen during his emotional resignation announcement, marking a major shift in Telangana’s political landscape. esakal
Updated on

BJP MLA T Raja Singh emotional reaction : भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार टी. राजा सिंह यांचा राजीनामा अखेर पक्षाने मंजूर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी टी. राजा यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी शुक्रवारी एक पत्र जारी करून याबाबत माहिती दिली आहे. तर आता पक्षाने राजीनामा मंजूर केल्यानंतर टी.राजा हे भावूक झाले असून, त्यांची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे.

भाजपने टी.राजा यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, 'तुमच्या राजीनाम्यात लिहिलेल्या गोष्टी अप्रासंगिक आहेत आणि पक्षाच्या कार्यशैली, विचारसरणी आणि तत्वांशी जुळत नाहीत. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार, तुमचा राजीनामा तात्काळ स्वीकारण्यात येत आहे.'

यावर टी. राजा सिंह यांची भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्षाने राजीनाम्याचा स्वीकार केल्यानंतर,  टी. राजा म्हणाले, 'आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. मी जनता, देश आणि हिंदुत्वाची सेवा करण्याच्या उद्देशाने भाजपमध्ये सामील झालो. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला गोशामहलमधून तीनदा तिकीट दिले, ज्यासाठी मी आभारी आहे.'

BJP MLA T Raja Singh seen during his emotional resignation announcement, marking a major shift in Telangana’s political landscape.
Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा ‘बोल्ड’ पाहतच राहिला!

याशिवाय टी. राजा सिंह असंही म्हणाले, 'कदाचित तेलंगणात भाजप सरकार स्थापन करण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचे दुःख मी दिल्लीपर्यंत पोहोचवू शकलो नाही. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा निर्णय कोणत्याही पदाने, सत्तेने किंवा वैयक्तिक स्वार्थाने प्रेरित नाही.'

BJP MLA T Raja Singh seen during his emotional resignation announcement, marking a major shift in Telangana’s political landscape.
Kapil Sharma Canada Cafe Shooting Video : कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर झालेल्या भयानक गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर!

याचबरोबर ते पुढे असंही म्हणाले की, 'मी हिंदुत्वाची सेवा करण्यासाठी जन्मलो आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि सनातन धर्माचे रक्षण करत राहीन. समाज आणि हिंदू समाजाच्या हक्कांसाठी माझा आवाज नेहमीच बुलंद राहील.' राजा सिंह यांनी असंही म्हटले की, त्यांचे समर्पण पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने असेल.

BJP MLA T Raja Singh seen during his emotional resignation announcement, marking a major shift in Telangana’s political landscape.
Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

टी राजा सिंह हे तेलंगणाचे एक फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जायचे. दरम्यान तेलंगणा भाजप अध्यक्ष पदासाठी एक नवीन नाव समोर आल्यानंतर टी. राजा यांनी नाराजीतून राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपले राजीनामा पत्र प्रदेश भाजप प्रमुख जी किशन रेड्डी यांना पाठवले होते. आपल्या पत्रात राजा सिंह यांनी स्पष्ट केले आहे की ते भाजपपासून वेगळे होत असले तरी, हिंदुत्व विचारसरणी आणि धर्मसेवेबद्दलची त्यांची वचनबद्धता कधीही बदलणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com