

T20 World Cup
sakal
भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या उत्तर प्रदेशातील हाथोडा या मूळ गावी दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळाला. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिशबाजी आणि मिठाई वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला.