esakal | ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप

बोलून बातमी शोधा

taj

सध्या खबरदारी बाळगत संपूर्ण परिसराची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य ताजमहलला आज गुरुवारी अचानकपणे बंद केलं गेलं आहे. ताजमहलमध्ये  बॉम्ब ठेवला असल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर CISF च्या जवानांना ताज महलमधील पर्यटकांना बाहेर काढलं आहे. तसेच ताज महलचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताज महलमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती दिली होती. सध्या खबरदारी बाळगत संपूर्ण परिसराची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मात्र आता एका टीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाने ही अफवा मुद्दाम पसरवली असल्याचं स्पष्ट होतंय. यामागचं कारणही तितकंच विचित्र आणि चिंताजनक आहे. नोकरभरती रद्द झाल्याच्या रागातून फिरोजाबादमधील एका युवकाने ही अफवा पसरवल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या एका युवकाने हा प्रताप केल्याचं समजत आहे.

कंट्रोल रुममध्ये आला होता फोन

आर्मी भरतीमध्ये घोळ आहे, आणि माझी भरती झालेली नाहीये. त्यामुळे ताजमहलमध्ये बॉम्ब ठेवला आहे आणि त्याचा लवकरच स्फोट होईल, असं सांगणारा फोन कंट्रोल रुममध्ये आला होता. हा फोन फिरोजाबादमधून आल्याचं स्पष्ट होतंय या दृष्टीने सध्या तपास सुरु असून ही अफवा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बेरोजगारीच्या मुद्यावरुन सध्या देशात असंतोष आहे. अशा पार्श्वभूमीवर या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कदाचित या मार्गाचा वापर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतची अधिक सविस्तर माहिती येणे बाकी आहे.