खूशखबर ! ताजमहलमध्ये तीन तास प्रवेश मोफत

वृत्तसंस्था
Sunday, 11 August 2019

12 ऑगस्ट रोजी बकरी ईदनिमित्त ताजमहालमध्ये तब्बल तीन तास मोफत प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. 

आग्रा - बकरी ईद निमित्त जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या ताजमहालमध्ये पर्यटकांना उद्या मोफत प्रवेश करता येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी बकरी ईदनिमित्त ताजमहालमध्ये तब्बल तीन तास मोफत प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. 

भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या दिवशी विशेष नमाज पठणासाठी ताजमहालमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम नागरीक येत असतात. तसेच पर्यटकांची संख्या ही जास्त असते. त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान तीन तासांच्या कालावधीत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

दहानंतर मात्र पर्यटकांकडून नेहमीप्रमाणे शूल्क आकारले जाणार आहे. ताजमहालमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान, आग्रा येथील 'ताजमहाल' पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taj Mahal entry to be free for 3 hours on Monday, huge crowd expected