अखेर १८८ दिवसांनी वाह ताज!; व्यावसायिकांना दिलासा

Taj Mahal reopens for public after six months
Taj Mahal reopens for public after six months

आग्रा - इतिहासात सर्वाधिक काळ बंद राहिल्यानंतर जगप्रसिद्ध ताज महाल सोमवारी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. १८८ दिवसांच्या खंडानंतर पर्यटकांचा प्रतिसाद पूर्वीच्या तुलनेत साहजिकच कमी होता. सकाळच्या सत्रात सुमारे पाचशे पर्यटकांचे आगमन झाले.

ताज महाल उघडण्यात आल्यामुळे छायाचित्रकार, रिक्षाचालक, गाईड, हॉटेलचालक आदी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीनंतर ताज महालची प्रवेशद्वारे खुली करण्यात आली. एरवी लांब रांगा असलेल्या ठिकाणी गर्दी कमी होती. सर्वांत आधी आत आलेल्या पर्यटकांमध्ये 25 वर्षीय देबार्घ सेनगुप्ता याचा समावेश होता. प्रयागराजमध्ये स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तो येथे आला. त्याने प्रथमच ताज महाल पाहिला. 

दरम्यान, विविध व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला. शेफाली नामक गाईड म्हणाली की, गर्दी फारशी नसली तरी ताज महाल उघडण्यात आल्यामुळे छान वाटते आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

छायाचित्रकारांना दिलासा
ताज महाल परिसरात छायाचित्रकार म्हणून व्यवसाय करण्यास 465 जणांना परवानगी आहे. त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून एक दिवसाआड त्यांना प्रवेश मिळेल. याशिवाय सकाळ व संध्याकाळ अशा सत्रांतही त्यांना आळीपाळीने प्रवेश मिळेल. छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष सर्वोत्तम सिंह यांनी सांगितले की, मुळातच स्मार्टफोनमुळे कमाई कमी झाली असताना कोरोनामुळे आणखी मोठा आर्थिक फटका बसला.

 प्रवेशावर मर्यादा
17 मार्च रोजी ताज महाल बंद
पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील तीन हजार 691 स्मारकांपैकी बहुतांश सहा जुलैपासून सुरू
कंटेन्मेंट विभागात असल्यामुळे ताज व आग्रा किल्ला सुरू करण्यास विलंब
दैनंदिन प्रवेशासाठी पर्यटकांची मर्यादा पाच हजार
सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी अडीच हजार जणांना प्रवेश

कडक बंदोबस्त
पर्यटकांनी ताज महालमधील विविध भाग तसेच कठड्यांना हात लावू नये म्हणून  
सुरक्षारक्षकांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. 
पर्यटकांनी वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, ग्लोव्हज स्वतंत्र कचराकुंडीत टाकले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com