जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा

पीटीआय
सोमवार, 30 डिसेंबर 2019

आलिशान मुख्यालय
नव्या मुख्यालयामध्ये तळमजल्यासह एकूण अकरा मजले असतील. यामध्ये ऑडिटोरियम, कॉन्फरन्स हॉल, कॅन्टीन, व्यायामशाळा, अतिथीगृह, किचन, भोजनगृह आणि पार्किंगची वेगळी व्यवस्था आदींचा समावेश आहे. या पार्किंगमध्ये एकाच वेळी ५२० कार आणि पंधरा बस पार्क केल्या जाऊ शकतात. सहाव्या आणि सातव्या मजल्यावर स्कायवॉक असेल.

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of the families of the jawans amit shah