esakal | परीक्षा घेताना घ्या काळजी; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
sakal

बोलून बातमी शोधा

exam

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवतानाच परीक्षा केंद्रांच्या निर्जंतुकीकरणाबाबतही सरकारने मार्गदर्शन केले आहे. 

परीक्षा घेताना घ्या काळजी; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - देशात विविध परीक्षांचे आयोजन करताना परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांची संख्या अधिक असताना कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवतानाच परीक्षा केंद्रांच्या निर्जंतुकीकरणाबाबतही सरकारने मार्गदर्शन केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयोजकांसाठी सूचना
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परीक्षा केंद्रांनाच परवानगी
प्रतिबंधित क्षेत्रामधील शिक्षक, विद्यार्थ्यांनाही प्रवेश नाही, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा इतर मार्गांनी घ्यावी
परीक्षा केंद्रांवर गर्दी टाळली जाईल अशा प्रकारे नियोजन करावे
विद्यार्थ्यांमध्ये अंतर राखता येईल इतक्या मोठ्या असाव्यात 
सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रकृतीबाबत प्रतिज्ञापत्र द्यावे
विद्यार्थ्यांना सर्व नियम पुरेसे आधी कळवावेत 
परीक्षा केंद्रावर एखाद्याला लक्षणे आढळल्यास त्यासाठी विलगीकरण कक्ष असावा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वसाधारण सूचना
दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर असावे
मास्कचा वापर अनिवार्य, सॅनिटायझर अथवा साबणाचा वारंवार वापर 
शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल असणे आवश्‍यकच, थुंकण्यास मनाई
आरोग्य सेतू ॲप बंधनकारक

loading image