esakal | मागासवर्गीय तरुणांना झालेल्या मारहाणीतील दोषींवर कठोर कारवाई करा - राहुल गांधी

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi

नेमकी घटना काय?
ही घटना राजस्थानातील कर्नू खेड्यातील असून, या दोन्ही तरुणांवर चोरीचा आळ घेत गॅरेजमधील टोळक्याने त्यांच्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. हे तरुण गाडीच्या दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला या दोघांनाही जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा लैंगिक छळही करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मागासवर्गीय तरुणांना झालेल्या मारहाणीतील दोषींवर कठोर कारवाई करा - राहुल गांधी
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली/जयपूर - राजस्थानमध्ये दोन मागासवर्गीय तरुणांना झालेली मारहाण आणि त्यांच्या लैंगिक छळ प्रकरणाची काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या तरुणांना झालेल्या मारहाणीचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाले असून, यामध्ये काही लोक या तरुणांना मारहाण करत त्यांचा लैंगिक छळ करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ एका आरोपीनेच रेकॉर्ड करून तो व्हायरल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आज दिल्लीत; महत्त्वाच्या नेत्यांची घेणार भेट

नागौर मारहाणीचे पडसाद
 राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील दोन मागासवर्गीय युवकांच्या कथित मारहाण प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल आणि पीडितांना न्याय मिळेल, असे आश्‍वासन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले.