esakal | पलानीस्वामींनी दिला राजीनामा, स्टॅलिन होणार प्रथमच मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

पलानीस्वामींचा राजीनामा, स्टॅलिन होणार पहिल्यांदाच मुख्यमंत्री

पलानीस्वामींचा राजीनामा, स्टॅलिन होणार पहिल्यांदाच मुख्यमंत्री

sakal_logo
By
नामदेव कुंभार

के. पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तमिळनाडूचे राज्यपाल बनवरीलाल पुरोहित यांच्याकडे सुपूर्द केला आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाला बहुमताचा आकडा पार न करता आल्यामुळे के. पलानीस्वामी यांनी राजीनामा दिला आहे. तमिळनाडूत सत्तापालट होणार हे चित्रं स्पष्ट झाल्यानंतर पलानीस्वामी यांनी राजीनामा दिला आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाने एक दशक विरोधी पक्ष राहिल्यानंतर अण्णाद्रमुकला शह देत पुनरागमन केले आहे. या पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन प्रथमच मुख्यमंत्री बनतील आणि दिवंगत पिता एम. करुणानिधी यांचा वारसा पुढे चालवतील.

तमिळनाडू राज्यात 234 पैकी 126 जागी द्रमुकनं विजय नोंदवला आहे. राज्यात भाजपने युती केलेल्या अण्णाद्रमुकला 64 ठिकाणीच विजय नोंदवता आलाय. २० जागा लढविलेल्या भाजपच्या खात्यात केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. तर २३ जागा लढविलेल्या पट्टाली मक्कल काचीला २३ पैकी पाच जागांवर समाधान मानावं लागेल.

हेही वाचा: द्रमुकची मुसंडी; तमिळनाडूच्या राजकारणात कुणाचं किती आहे वजन

मी तुमच्याशी खरेपणाने वागेन. मी तुमच्यासाठी काम करेन. माझे विचार आणि कृती तमिळनाडूच्या लोकांसाठी असेल. पक्ष कार्यकर्ते, वरिष्ठ नेते, युतीचे नेते यांचा मी आभारी आहे, असं स्टॅलिन यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. रमुकचे करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या जयललिता या नेत्यांच्या निधनानंतर राज्याने प्रथमच कौल दिला. त्यात स्टॅलिन यांच्या मेहनतीला फळ मिळाले. दरम्यान, अभिनेते कमल हसन यांना दक्षिण कोइमतूर मतदारसंघातून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. द्रमुकने याआधी १९६७ ते ७१, ७१ ते ७६, ८९ ते ९१, ९६ ते २००१ आणि २००६ ते २०११ अशा पाच वेळा तमिळनाडूवर राज्य केले.

loading image