मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर हल्ला; म्हणाले, राज्यपाल हे केवळ पोस्टमनसारखे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamil Nadu Chief Minister MK Stalin attacks Governor

मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर हल्ला; म्हणाले, राज्यपाल हे केवळ पोस्टमनसारखे

राज्यपाल हे केवळ पोस्टमनसारखे आहेत. त्यांना पत्र उघडण्याचा अधिकार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) म्हणाले. एक दिवसापूर्वी तामिळनाडू (Tamil Nadu) विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. ज्याअंतर्गत राज्य विद्यापीठांमध्ये कुलगुरू नियुक्त करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे येणार आहे. पूर्वी हा अधिकार राज्यपालांकडे होता. (Tamil Nadu Chief Minister MK Stalin attacks Governor)

स्टॅलिन हे द्रविड पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. राज्यपालांनी मंत्रिमंडळातून मंजूर केलेले विधेयक थेट राष्ट्रपतींकडे पाठवावे, असेही मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले. द्रविडभर कळघमचे अध्यक्ष के वीरामानी म्हणाले की, राज्यपाल आरएन रवी हे फक्त पोस्टमन आहेत ज्यांना पत्र उघडण्याचा अधिकार नाही. फक्त राष्ट्रपतींना पत्र पाठवा आणि उत्तराची प्रतीक्षा करा. नंतर एमके स्टॅलिन यांनी शब्दांची पुनरावृत्ती केली.

हेही वाचा: हंबरडा फोडत वडिलांनी मुलाचा मृतदेह स्कूटरवरून नेला ९० किमीपर्यंत

राज्यपाल कुलगुरूंची नियुक्ती करतात आणि त्यानंतर राज्य सरकार कोणताही प्रशासकीय निर्णय घेते तेव्हा समस्यांना सामोरे जावे लागते. विधानसभेतून विधेयक मंजूर करूनही राज्यपाल आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली नाही असे दोनदा घडले आहे, असे विधानसभेत विधेयक मांडल्यानंतर एमके स्टॅलिन म्हणाले होते. NEET संबंधित विधेयक फेटाळल्यानंतर एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.

एमके स्टॅलिन यांनी सोमवारी विधानसभेत विद्यापीठाशी संबंधित विधेयक मांडल्यानंतर गुजरातचे उदाहरण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य गुजरातमध्येही कुलगुरू नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांकडे (Governor) नसून राज्य सरकारकडे आहे, असे स्टॅलिन (MK Stalin) म्हणाले. यादरम्यान भाजप आणि एआयडीएमकेच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.

Web Title: Tamil Nadu Chief Minister Mk Stalin Attacks Governor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..