
हंबरडा फोडत वडिलांनी मुलाचा मृतदेह स्कूटरवरून नेला ९० किमीपर्यंत
रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलाचा मृत्यू झाला. यानंतर वडिलांनी मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयातून रुग्णवाहिका मागितली. मात्र, रुग्णवाहिका मिळाली नाही. यानंतर कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी मोठी रक्कम मागितली. मात्र, ती रक्कम देणे वडिलांना शक्य नव्हते. हळव्या मनाने शेवटी वडील मुलाचा मृतदेह स्कूटरवरून ९० किमी दूर गावी घेऊन गेले. हा प्रकार आंध्र प्रदेशात घडला. (Father carried the boys body on a scooter for 90 km)
प्राप्त माहितीनुसार, उपचार करण्यासाठी वडिलांनी मुलाला आंध्र प्रदेशातील निरूपती येथील रुग्णालय श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईयामध्ये दाखल केले. काही दिवस मुलावर उपचार सुरू होता. मात्र, उपचाराला मुलगा प्रतिसाद देत नव्हता. यातच त्याचा मृत्यू झाला. याची माहिती डॉक्टरांनी वडिलांना दिली. यानंतर वडिलांनी रुग्णालयाला मुलाचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका (ambulance) देण्याची मागणी केली.
हेही वाचा: Pakistan : वर्षभरात चिनी नागरिकांवर तिसरा हल्ला; जवान सुरक्षेत होते तैनात
मात्र, रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. यामुळे वडील हताश झाले. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिकेसाठी (ambulance) मोठ्या रकमेची मागणी केली. मात्र, गरीब वडिलांकडे इतके पैसे नव्हते. पैशांअभावी गरीब पित्याने मुलाचा मृतदेह (death body) स्कूटरने अन्नमय जिल्ह्यातील चितवेल मंडल येथील गावी नेण्याचा निर्णय घेतला. गाव रुग्णालयापासून ९० किमी दूर आहे.
ही बाब वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर रुग्णालय प्रशासन कारवाईत आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भारती यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना रात्रीच्या ड्युटीवर बोलावून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा: जयशंकर यांनी पुन्हा एकदा युक्रेनवर युरोपीय देशांना सुनावले; म्हणाले...
विरोधी तेलुगू देसम पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी वायएसआरसीपीला लक्ष्य केले. आमदार नारा लोकेश म्हणाले, ९० किलोमीटर एका बापाला मुलाचा मृतदेह (death body) दुचाकीवर घेऊन जाण्यास भाग पाडले गेले. राज्यातील खाजगी रुग्णवाहिका माफिया आणि मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्यावर लोकांची लूट करण्याचा आरोप केला.
Web Title: Father Carried The Boys Body On A Scooter For 90 Km Andhra Pradesh Ambulance Not Available
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..