
तमिळनाडू : सत्ताधारी डीएमके नेत्याच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश
तामिळनाडूमधील द्रमुकचे मोठे नेते आणि राज्यसभा खासदार त्रिची सिवा यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापुर्वीच सूर्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान टी शिवा हे डीएमके पक्षाकडून चौथ्यांदा राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना 2 मार्च 2020 रोजी चौथ्यांदा राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. चौथ्यांदा राज्यसभेत पोहोचलेले ते द्रमुकचे पहिले खासदार आहेत. ते पहिल्यांदा 1996 मध्ये मध्ये संसदेत पोहोचले, त्यानंतर 2002, 2007, 2014 आणि पुन्हा 2020 मध्ये ते राज्यसभेत पोहोचले होते.
टी शिवा डीएमकेचे मोठे नेते
त्रिची शिवा हे सरकारवर सतत टीका करण्यासाठी ओळखले जातात. तमिळनाडूमध्ये हिंदी शिकवणे अनिवार्य करण्यालाही त्यांनी विरोध केला. तामिळनाडूमध्ये हिंदी लागू करण्याचा प्रयत्न करून केंद्र सरकार आगीशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे, असे द्रमुकचे खासदार म्हणाले होते.
याशिवाय टी सिवा यांनी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यां विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. टी शिव हे त्यांच्या सरकारविरोधी आवाजासाठी ओळखले जातात. ते द्रमुकचे मुखपत्र आणि इतर वृत्तपत्रांसाठी लेख लिहितात, त्यामुळे टी शिव यांचा मुलगा सूर्या याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने तामिळनाडूतील डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, दक्षिण राज्यात भाजपसाठी हे मोठे यश आहे