
Women In Hazardous Factory Work
ESakal
महिलांना समान हक्क देण्यासाठी तामिळनाडू सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने तामिळनाडू कारखाने नियम, १९५० मध्ये सुधारणा केली आहे. ज्यामुळे महिलांना सुमारे २० कामे करण्याची परवानगी देण्यात आली आहे जी पूर्वी "धोकादायक" मानली जात होती आणि करण्यास मनाई होती. शिवाय रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करू इच्छिणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडून लेखी संमती आवश्यक असलेल्या नियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे.