तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; 3 ठार, 5 जखमी I Cracker Factory Fire | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firecracker Factory Fire

तामिळनाडूतील फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागलीय.

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; 3 ठार, 5 जखमी

Firecracker Factory Fire : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) विरुधुनगर जिल्ह्याजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागलीय. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी मेघनाथ रेड्डी (Collector Meghanath Reddy) यांनी ही माहिती दिलीय. फॅक्टरीत अचानक झालेल्या स्फोटानंतर ही आग लागल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. जिल्ह्यातील शिवकाशीजवळील मेट्टुपत्ती गावात (Mettupatti Village) ही घटना घडलीय.

हेही वाचा: पत्नीच्या मदतीनं चर्चमधील फादरनं केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आज (शनिवार) सकाळी RKVM फटाक्यांच्या कारखान्यात (Firecracker Factory) आग लागली. यामुळं अनेक स्फोट झाले, तर आगीत सात गोदामं आणि शेड जळून खाक झाली आहेत. कारखान्यात फटाके आणि रसायनांचा (Cracker Factory Fire) मोठा साठा होता. रसायनं हाताळताना घर्षण झाल्यानं हा स्फोट झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणली जात आहे.

Firecracker Factory Fire

Firecracker Factory Fire

हेही वाचा: वैष्णो देवीच नव्हे, तर भारतासाठी 1 जानेवारीचा इतिहास भयंकर आहे!

या दुर्घटनेनंतर जखमींना उपचारासाठी शिवकाशी येथील शासकीय रुग्णालयात (Sivakasi Government Hospital) सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल करण्यात आलंय. सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे, की नाही हे तपासण्यासाठी वरिष्ठ महसूल आणि पोलिस अधिकारी कारखान्यात पोहोचले आहेत. घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झालीय. दुर्घटनेनंतर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tamil Nadu
loading image
go to top