पत्नीच्या मदतीनं चर्चमधील फादरनं केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Crime News

तापी जिल्ह्यातून बलात्काराची एक घृणास्पद घटना समोर आलीय.

पत्नीच्या मदतीनं चर्चमधील फादरनं केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गांधीनगर : गुजरातच्या (Gujarat) तापी जिल्ह्यातून (Tapi District) बलात्काराची एक घृणास्पद घटना समोर आलीय. सोनगड पोलीस ठाण्यात (Sonagad Police Station) दाखल झालेल्या एफआयआरनुसार, चर्चच्या फादरनं एका अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवत तिच्यावर बलात्कार केलाय. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीनंही हे घृणास्पद कृत्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फादर आणि त्याच्या पत्नीला अटक केलीय.

दक्षिण गुजरातमधील (South Gujarat) आदिवासीबहुल तापी जिल्ह्यातील सोनगड पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीची ओळख बळीराम कोकणी (Baliram Konkani) आणि अनिता कोकणी (Anita Konkani) अशी आहे. दोघंही पती-पत्नी आहेत. बळीराम हा सोनगड परिसरात असलेल्या चर्चचा फादर आहे. सोनगड पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बळीराम कोकणीला अटक केलीय, तर त्याची पत्नी अनिता हिला या कामात मदत करून पीडितेचा व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

हेही वाचा: North Korea : नवीन वर्षात हुकूमशहा Kim Jong Un सुधारणार?

पीडिता तिच्या आजीसोबत आरोपी बळीरामच्या शेतात मजुरीसाठी जात होती. एकेदिवशी पीडिता तिच्या पालकांसोबत चर्चमध्ये गेली होती, त्यावेळी तिची आणि फादरची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीनं पीडितेवर शेतात कामाला बोलवून तिच्यावर बलात्कार केलाय. आरोपी फादरनं पीडितेला शेतात बांधलेल्या झोपडीत नेऊन बलात्कार केला. यावेळी त्याची पत्नी अनिताही तिथं उपस्थित होती. दरम्यान, याआधी 31 मे रोजी आरोपीनं आणखी एका पीडितेला आधारकार्ड घेऊन शेतावर ये, असं म्हंटलं होतं. काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचं आरोपीनं सांगितलं. यादरम्यान बळीरामनं पीडितेवर बलात्कार केला होता. त्या काळातही त्याच्या पत्नीनं मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले होते.

हेही वाचा: परळ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिठी मारत अश्लील शेरेबाजी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Gujarat
loading image
go to top