Tamil Nadu School Foodesakal
देश
संतापजनक! शाळेतील पिण्याच्या पाण्यात मिसळली मानवी विष्ठा; त्याच पाण्यात अन्न शिजवून विद्यार्थ्यांना घातले खाऊ
Tamil Nadu School Food, Human Waste Contamination : दारूच्या नशेत असलेल्या तीन जणांनी जबरदस्तीने शाळेच्या आवारात प्रवेश केला. या व्यक्तींनी स्वयंपाकघरात ठेवलेल्या पाण्याच्या हंड्यात जाणूनबुजून मानवी विष्ठा मिसळली, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तिरुवरुर : तामिळनाडूच्या तिरुवरुर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत (Government Schools) विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी (Students Health) आणि सुरक्षिततेशी संबंधित एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या स्वयंपाकघरातील पाण्यात मानवी विष्ठा मिसळण्यात आली आणि त्याच पाण्यात अन्न शिजवून विद्यार्थ्यांना दिल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.