Insurance Fraud Case
esakal
थिरुवल्लूर : तामिळनाडूच्या थिरुवल्लूर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, तब्बल ३ कोटी रुपयांच्या विम्याची (Insurance Fraud Case) रक्कम मिळवण्यासाठी मुलांनीच वडिलांच्या अंगावर साप सोडून त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या दोन मुलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.