Tamil Nadu Crime : तामिळनाडूच्या अवडी जिल्ह्यात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीवर चाकूने (Woman Councillor Killed) वार करून तिचा खून केला. मृत महिला विदुथलाई चिरुथैगल कच्ची (VCK) पक्षाची नगरसेविका गोमती असून, आरोपी पतीचे नाव स्टीफन राज आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.