M K Stalin: तमिळनाडूत गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्न : एम. के. स्टॅलिन
Tamil Nadu: तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, राज्यातील औद्योगिकदृष्ट्या मागे असलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी आणि युवकांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यांनी २०३० पर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेला १,००० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
थुथुकोडी (तमिळनाडू) : तमिळनाडूमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि येथील युवकांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी द्रमुक सरकार अत्यंत पद्धतशीरपणे प्रयत्न करत आहे, असा दावा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सोमवारी केला.