प्रेमसंबंधाची बळजबरी केल्याने अभिनेत्रीने पतीसमोरच केली त्याची...

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जानेवारी 2020

तामिळनाडूतील कोलठूरमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. मल्ल्याळम अभिनेत्री एस. देवीने हातोड्याने डोक्यावर वार करुन 38 वर्षीय एम. रवी याची हत्या केली.

चेन्नई : तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका 42 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने नवऱ्यासमोरच आपल्या एक्स-बॉयफ्रेण्डची हत्या केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील कोलठूरमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. मल्ल्याळम अभिनेत्री एस. देवीने हातोड्याने डोक्यावर वार करुन 38 वर्षीय एम. रवी याची हत्या केली. रवी याने प्रेमसंबंध ठेवण्याची बळजबरी केल्यामुळेच आपण त्याचा जीव घेतल्याचे तिने सांगितले. देवीच्या बहिणीच्या राहत्या घरी हे हत्याकांड झाले आहे.

#HappyNew2020 : जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत

हत्येनंतर तिने पोलिसांंत आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी तिचा पती, बहीण एस लक्ष्मी आणि तिच्या पतीला अटक केली आहे. यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हत्या झालेला रवी हा चेन्नईत राहत होता. आठ वर्षांपूर्वी त्याची ओळख एस देवीशी झाली. एस देवी त्यावेळी मालिकांमध्ये लहान-मोठ्या भूमिका करत असे. ओळखीचं रुपांतर मैत्री आणि प्रेमात झाले होते. काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर देवीच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती झाली. अखेर या वादाचे रुपांतर हत्याकांडात झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil TV actress S Devi kills ex-boyfriend in front of her husband

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: