#HappyNew2020 : जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत

Untitled-2.jpg
Untitled-2.jpg

दिल्ली : भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या जल्लोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. रात्री बाराच्या ठोक्याला एकच गलका करत सर्वांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आणि ‘2020’ चं उत्साहाने स्वागत केलं.

दरम्यान, न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये सर्वात प्रथम नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं स्वागत झालं. तर त्यानंतर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. कुठे हॉटेल किंवा रिसॉर्टवर कौटुंबिक सेलिब्रेशन करण्यात आलं, तर कुठे रिसॉर्टवर एकत्र जमून मित्र-मंडळींनी ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला.

गेट वे ऑफ इंडियावरही मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात नववर्षांचं स्वागत केलं.

मुंबईतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रोषणाई करण्यात आली होती.

वाराणसीमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गंगेच्या आरतीनं करण्यात आली.

नववर्षाच्या स्वागतासाठी बुर्ज अल खलिफालाही रोषणाई करण्यात आली होती.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालमधील हावडा ब्रिजचा नजारा

नववर्षाचं स्वागत करताना उत्तराखंडमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी गाण्यावर ठेका धरला.छत्तीसगढमधील रायपुर येथे सीआरपीएफच्या जवानांनी काही अशा प्रकारे नववर्षाचं स्वागत केलं.

नववर्षाच्या स्वागतादरम्यान केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांनी सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं.

तुर्कस्थानात बॉस्फोरस स्ट्रेट येथं जोरदार आतषबाजीमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

ग्रीसमध्येही मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

आर्क डी ट्रायंफमध्ये मोठ्या उत्साहात नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं.

थायलंडमध्ये आतषबाजी करत सर्वांनी नववर्षाचं स्वागत केलं.

हाँगकाँगमध्ये व्हिक्टोरिया हार्बर येथे आतषबासोबतच नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

जापानमध्येही मोठ्या उत्साहात लोकांनी नववर्षांचं स्वागत केलं.

न्यूझीलंडमध्ये अशाप्रकारे करण्यात आलं नववर्षाचं स्वागत

सिडनीमध्ये आतषबाजी करत झालं नववर्षाचं स्वागत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com