छप्परफाड आश्वासनं! कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, वर्षाला 6 सिलिंडर मोफत

tamilnadu
tamilnadu

चेन्नई- चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील लोकांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. विरोधकांपेक्षा अधिक काहीतरी देण्याचं आश्वासन देण्यासाकडे राजकीय पक्षांचा कल आहे.  घोषणापत्रांमधून लोकांना लुभावण्यात येत आहे. त्यातच तमिळनाडूतील सत्ताधारी AIADMK ने जनतेला सुखावणाऱ्या पण काहीशा अविश्वसनीय घोषणा केल्या आहेत. रविवारी रात्री जारी केलेल्या घोषणापत्रात AIADMK ने अनेक आश्वासनं दिले आहेत. यातील प्रत्येक कुटुंबातील एक सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. AIADMK ने वचन दिलंय की, यावेळी पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल.  AIADMK ने याशिवाय प्रत्येक परिवाराला दरवर्षी 6 एलपीजी सिलिंडर मोफत देणार असल्याचं जाहीर केलंय. 

नागरिकत्व सुधारणा कायद्याप्रकरणीही (CAA) AIADMK ने भाष्य केलंय. केंद्र सरकारने हा कायदा रद्द करावा, अशी मागणी पक्ष करत राहील. AIADMK  नेते सी प्रोन्नयन यांनी घोषणापत्र वाचताना ही माहिती दिली. श्रीलंकेच्या तमिळ शरणार्थीसंबंधी त्यांनी म्हटलं की, दुहेरी नागरिकत्व आणि रहिवाशी परमिटसाठी केंद्राकडे विनंती करण्यात येईल. 

भाजप आणि AIADMK मिळून लढवत आहेत निवडणुका 

तमिळनाडूमध्ये सत्ताधारी AIADMK भारतीय जनता पक्षासोबत मिळून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे, राज्याच्या एकूण 234 विधानसभेच्या जागांसाठी 6 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासाठी AIADMK 177 जागांसाठी उमेदवार उभे करणार आहे. दुसरीकडे भाजप 43 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तमिळनाडू विधानसभेचा निकाल 2 मे रोजी घोषित करण्यात येईल. दुसरीकडे द्रमुकनेही आपल्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती क्रमशः पाच व चार रुपये लिटर कमी करण्याची आणि गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा द्रमुकने केली आहे. इंधन व गॅस दरात कपात करण्याबरोबरच ५०० घोषणा केल्या आहेत. यामध्ये शैक्षणिक कर्जाची माफी, आविन दुधाचा दर तीन रुपयांनी कमी करणे, शिधापत्रिकाधारकांना चार हजार रुपये मदतनिधी देणे, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप, ‘नीट’ परीक्षा रद्द करणे या काही ठळक घोषणा आहेत.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु होईल. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पु्न्हा सरकार स्थापन करण्याची संधी आहे. पण, भाजपने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. tamilnadu assembly election 2021


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com