कोर्टाच्या 'या' निर्णयावर हसावं की, रडावं? थेट देवालाच न्यायालयात हजर राहण्याचा 'समन्स' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madras High Court

न्यायालयानं दिलेल्या 'त्या' आदेशानं सगळेच अवाक् झाले.

थेट देवालाच न्यायालयात हजर राहण्याचा 'समन्स'

तामिळनाडूतील (Tamil Nadu) प्राचीन मंदिरांमधून अनेक मौल्यवान मूर्ती चोरीला गेल्या आहेत. येथील मूलवरांची अशीच एक मूर्तीही चोरीला गेली होती. आता पोलिसांच्या वेगवान तपासामुळं ती मूर्ती परत मंदिरात आणण्यात आलीय; पण कनिष्ठ न्यायालयानं (Court) दिलेल्या आदेशानं सगळेच अवाक् झाले. कोर्टानं देवाला हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. मात्र, कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं (Madras High Court) रद्दबातल ठरवलाय.

दरम्यान, कोणताही न्यायाधीश देवाला कसं बोलावू शकतो, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. हा सगळा वाद मूलवरांच्या मूर्तीवरून झाला होता. काही दिवसांपूर्वी मंदिरातून ही मूर्ती चोरीला गेली होती. नंतर, तत्परतेनं कारवाई करत पोलिसांनी (Police) ती मूर्ती शोधून काढली आणि नंतर ती मंदिरात स्थापित केली. मात्र, त्या स्थापनेनंतर कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मूर्तीची पाहणी करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. दरम्यान, त्याच तपासणीसाठी मूर्ती न्यायालयात सादर केली जावी, असे आदेश त्यांनी दिले.

हेही वाचा: 'मी त्याला स्पष्ट सांगितलंय, तू उद्यापासून…'; भावावर ममता बॅनर्जी भडकल्या

न्यायमूर्तींच्या आदेशाचं पालन करण्यासाठी स्थापित मूर्ती हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे पाहून स्थानिक लोक संतप्त झाले आणि एका व्यक्तीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मूर्तीला समन्स कसा बजावला जाऊ शकतो, याविषयी ती याचिका होती. आता हायकोर्टानं संताप व्यक्त केलाय. न्यायाधीश असा निर्णय कसा देऊ शकतात, याचं त्यांना आश्चर्य वाटतंय. अशा प्रकरणांत वकिल आयुक्तांची नियुक्ती न्यायाधीशांमार्फत करता आली असती, असा आग्रह उच्च न्यायालयानं धरलाय.

Web Title: Tamilnadu God Court Shocking Summon Inside Detail Police Madras High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top