'मी त्याला स्पष्ट सांगितलंय, तू उद्यापासून…'; स्वतःच्या भावावरच ममता बॅनर्जी भडकल्या I Mamata Banerjee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे.

'मी त्याला स्पष्ट सांगितलंय, तू उद्यापासून…'; भावावर ममता बॅनर्जी भडकल्या

देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत १५ हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झालीय. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या (Mamata Banerjee) भावाची पत्नी आणि त्यांच्या दोन ड्रायव्हरनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. कोरोनाचा संसर्ग असूनही भाऊ फिरत असल्यानं ममता बॅनर्जी नाराज झाल्याचं पहायला मिळतंय.

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. त्यातच ओमायक्रॉनच्या (Omicron Virus) संकटाचं ढगही घोंगावत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, तुमच्या घरातील एखाद्याला कोरोना असेल तर तुम्ही इकडं-तिकडं जाऊ शकत नाही, हे आम्ही विसरलो आहोत असं दिसतंय. माझ्या घरातील कोणीतरी हे कृत्य केलंय आणि त्यामुळं मी खूप दुखावलीय. माझ्या धाकट्या भावाच्या पत्नीला कोरोना संसर्ग झालाय; पण माझा भाऊ बाबून बाहेर फिरत आहे. मला ते आवडत नाही. मी त्याला उद्यापासून कुठंही बाहेर न जाण्याचा सल्ला दिलाय.

हेही वाचा: 'योग्य संधी चालून आलीय, भाजपच्या पराभवासाठी महाआघाडीत एकत्र या'

पश्चिम बंगालमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५४२१ नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यानंतर राज्यातील बाधितांची संख्या १६,९३,७४४ झालीय. आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आणखी १९ बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर राज्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं मृतांची संख्या १९,८४६ झाली आहे. त्यामुळं कोरोना निगेटिव्ह असू शकतो, पण तरीही आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, असं आवाहनही ममतांनी केलंय.

हेही वाचा: निवडणुकीत दोन माजी आमदारांचा 'करेक्ट कार्यक्रम'; काँग्रेसचं वर्चस्व वाढलं

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top