तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tarun tejpal

तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता

sakal_logo
By
सूरज यादव

पणजी - तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल लागला असून लैंगिक अत्याचार प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी तरुण तेजपाल यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याने न्यायालयाने त्यांना या आरोपातून मुक्त केले. तरुण तेजपाल यांच्याविरोधीतल या प्रकरणाची सुनावणी बुधवारी करण्यात येणार होती. मात्र कोर्टात वीज पुरवठ्याची समस्या असल्याने हा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. म्हापसा येथील जिल्हा न्यायालयाच्या न्या. शमा जोशी यांनी निकाल दिला. भारतीय दंड संहितेच्या ३७६ (बलात्कार) ३४१, ३४२, ३५४अ व ३५४ब या कलमांन्वये तेजपाल याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या सर्वांमधून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.(Tarun Tejpal acquitted of all charges in the alleged sexual assault case against him)

तरुण तेजपाल याच्यावर सहकारी तरुणीचे लैगिक शोषण केल्याचा आरोप होता. २०१३ मध्ये गोव्यात बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’च्या दरम्यान हे प्रकरण घडले होते. याप्रकरणाची राष्ट्रीय पातळीवर बरीच चर्चा झाली. प्रकरण संवेदनशील असल्याने तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. काइम ब्रांचच्या तत्कालीन निरीक्षक आणि विद्यमान पोलिस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी त्या प्रकरणाचा तपास करून तेजपाल याच्याविरोधात आरोपपत्र सादर केले होते. याप्रकरणात सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. या खटल्यावरील सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली.

loading image
go to top