काँग्रेसकडून दोन गटांची स्थापना; प्रशांत किशोर यांच्या माजी सहकाऱ्याला स्थान | Congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Congress

काँग्रेसकडून दोन गटांची स्थापना; प्रशांत किशोर यांच्या माजी सहकाऱ्याला स्थान

नवी दिल्ली : भारतीय राजकारणात मागे पडत चाललेल्या काँग्रेस पक्षाने (Congress) 2024 च्या निवडणुकीत पकड मजबूत करण्यासाठी पाउलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या चिंतन शिबिरानंतर (Chintan Shivir) काँग्रेसकडून आगामी 2024 च्या निवडणुका लक्षात घेत पॉलिटिकल अफेअर ग्रुप आणि टास्क फोर्स-2024 (Task Force) ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचे माजी सहकारी सुनील कानुगोलू यांना पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापनासाठी निवडण्यात आले आहे. याशिवाय राहुल गांधी यांचा राजकीय घडामोडी गटात समावेश करण्यात आला आहे, तर प्रियंका गांधी यांना टास्क फोर्स-2024 चे सदस्य बनवण्यात आले आहे. (Congress Taskforce 2024 After Mega Conclave)

याशिवाय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही अनेक बंडखोर नेत्यांना स्थान दिले आहे. या दोन गटांशिवाय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही भारत जोड यात्रेसाठी मध्यवर्ती संघटना स्थापन केली आहे. यात दिग्विजय सिंह, सचिन पायलट, शशी थरूर, रणवीत सिंह बिट्टू, केजे जॉर्ज, जोथी मणी, प्रद्युत बोलडोलोई, जीतू पटवारी, सलीम अहमद यांना स्थान मिळाले आहे.

हेही वाचा: "अमेरिका, युरोपच्या नाकावर टिच्चून..."; फडणवीसांनी केलं मोदींचं कौतुक

पॉलिटिकल अफेअर ग्रुपमध्ये यांना मिळाले स्थान

राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझादी, अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल, जितेंद्र सिंग यांचा काँग्रेसने स्थापन केलेल्या पॉलिटिकल अफेअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर, टास्क फोर्समध्ये पी चिदंबरम, मुकुल वासनिक, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, अजय माकन, प्रियंका गांधी, रणदीप सुरजेवाला, सुनील कोंगोलू यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसने जारी केलेल्या पत्रात टास्क फोर्सच्या प्रत्येक सदस्याला संघटना, कम्युनिकेशन आणि मीडिया, वित्त आणि निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित काम दिले जाईल, असे म्हटले आहे. (Congress Political Affair Group)

Web Title: Taskforce 2024 Among Congresss Big Announcements After Mega Conclave

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top