Tata Group UP: टाटा समूहाने UP साठी उघडला खजिना; लखनौला बनवणार 'एआय सिटी', TCS मध्ये करणार मेगा भरती
Tata Group Proposes AI City in Lucknow: टाटा समूहाने उत्तर प्रदेशसाठी मोठी गुंतवणूक जाहीर केली असून लखनौमध्ये ‘एआय सिटी’ उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. टीसीएसमध्ये ३० हजारांपर्यंत भरती, गोरखपूरमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आणि डिफेन्स क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यात सोमवारी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत टाटा समूहाच्या सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा आणि त्यांच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली.