
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ‘राफेल’ या लढाऊ विमानाच्या काही सुट्या भागांची निर्मिती टाटा उद्योगसमूह करणार असून भारतासह अन्य देशांमध्ये त्यांची विक्री करण्यात येईल. यासाठी टाटा समूहाने ‘डसॉल्ट एव्हिएशन’ या फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी केली आहे. हैदराबादेतील प्रकल्पामध्ये या सुट्या भागांची निर्मिती करण्यात येईल.