तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग; चंद्राबाबू दिल्लीत

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मे 2019

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्ष सरसावले आहेत. एनडीएला दूर ठेवण्यासाठी महागठबंधनमधील अनेक पक्षांनी आताच मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडणार आहे. या नंतर 23 मे रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापूर्वीच दिल्लीत तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज (शनिवार) दिल्लीत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्ष सरसावले आहेत. एनडीएला दूर ठेवण्यासाठी महागठबंधनमधील अनेक पक्षांनी आताच मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडणार आहे. या नंतर 23 मे रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल. 

चंद्राबाबू नायडू यांनी आज सकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाली. यानंतर चंद्राबाबू आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि एलजेडीचे अध्यक्ष शरद यादव यांचीही भेट घेणार आहेत. तसेच सीपीआयचे सुधाकर रेड्डी आणि डी. राजा यांनाही भेटून आज रात्री ते लखनौला रवाना होणार आहेत. तेथे ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावतींना भेटणार आहेत. चंद्राबाबू यांनी नुकतीच तृणमुलच्या ममता बॅनर्जी यांना भेट घेतली होती. या सर्व घडामोडी पाहून भाजपला रोखण्यासाठी आता विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TDP chief Naidu meets Rahul Gandhi discusses firming up anti BJP front