

Tea Cultivation
esakal
उत्तराखंडमधील पर्वतीय भागांसमोर सध्या रोजगाराचा अभाव आणि त्यामुळे होणारे गावांमधील पलायन (Migration) हे दोन मोठे कळीचे मुद्दे आहेत. मात्र, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील जखोली ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांनी या समस्येवर चहाच्या शेतीचा (Tea Cultivation) एक अद्भूत आणि यशस्वी मार्ग शोधून काढला आहे.
ज्या जमिनीवर कधी गवतही उगवत नव्हते आणि ज्या जमिनी वर्षानुवर्षे पडीक पडल्या होत्या, तिथे आज चहाच्या बागांची सुंदर हिरवळ पाहायला मिळत आहे. 'उत्तराखंड चहा विकास बोर्डाच्या' विशेष पुढाकारामुळे तयार झालेले हे चहाचे मळे केवळ महिलांना सन्मानजनक रोजगारच मिळवून देत नाहीत, तर पलायनाच्या छायेत वावरणाऱ्या गावांमध्ये विकासाची एक नवी पहाट घेऊन आले आहेत.