Positive story: चहाच्या मळ्यातील कामगार ते ड्रॅगन फ्रूटचे उत्पादक; 400 रुपये किलोने करतायत विक्री

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 8 October 2020

कोरोनाच्या वाढलेल्या प्रसारामुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याकाळात मोठमोठे उद्योगधंदे, व्यवसाय आणि पर्यटन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. जवळापास 3 कोटी लोकं याकाळात बेरोजगार झाले होते.

दार्जिलिंग:  कोरोनाच्या वाढलेल्या प्रसारामुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याकाळात मोठमोठे उद्योगधंदे, व्यवसाय आणि पर्यटन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. जवळापास 3 कोटी लोकं याकाळात बेरोजगार झाले होते. अशातही काही जणांनी या बिकट परिस्थितीत उत्तम मार्ग काढल्याचे दिसले होते. त्यामध्ये पश्चिम बंगालमधील एका दाम्पत्याने एक शक्कल लढवली असून आज ते हजारो रुपये कमवत आहेत. 

सध्याच्या कोरोना काळात लोकं बाहेरचं खाणं टाळत आहेत. त्याचाच अभ्यास करून दार्जिलिंग(Darjeeling) जिल्ह्यातील सिलीगुडी गावातील दाम्पत्याने ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. आज हे दाम्पत्य ड्रॅगन फ्रुटच्या विक्रीतून हजारो रुपये कमवत आहे. सध्या या फळाची मागणी वाढल्याने ड्रॅगन फ्रुट प्रतिकिलो 400 रुपयांपर्यंत विकले जात आहे. याबद्दल बोलताना अवा टोप्पो म्हणाली, " यापुर्वी आम्ही सुरुवातीला चहाच्या मळ्यात काम करायचो. त्यानंतर उत्तर बंगाल विद्यापीठातून प्रशिक्षण घेतल्यानंतर, सुरुवातीला आम्ही 4 ड्रॅगन फ्रुटची रोपे लावले होती. जी आता 123 पर्यंत गेली आहेत."

ड्रॅगन फ्रूट घेण्यासाठी लोकं अवाच्या घरी येत असल्याचे त्यांनी सांगितले. 'आम्हाला ड्रॅगन फ्रूटच्या (dragon fruit) लागवडीतून भरपूर पैसे मिळत आहेत. इथले स्थानिक लोकंही आम्हाला ड्रॅगन फ्रूच्या लागवडीविषयी विचारण्यासाठी येत आहेत. अशा बिकट परिस्थितीत या दाम्पत्याच्या कार्याचं सगळीकडे कौतूक केलं जात आहे.    

Positive Story: 'मास्क-संजिवनी' देणारा 'हनुमान'; आतापर्यंत शिवून वाटले 6 हजार मास्क

'देशात कोरोनावर लस कधी येईल याबद्दल अनिश्चितता आहे. कोरोना टाळायचा असेल तर लोकांना त्यांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी लागणार आहे. हे फळ शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामध्ये मॅग्नेशियम, जीवनसत्वे आणि शरीराला आवश्यक असणाऱ्या खणिजांचं प्रमाण चांगलं असतं' अशी माहितीही डॉक्टर पी टी भूतिया यांनी दिली आहे. भूतिया हे सिलिगुडीत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tea farm workers to dragon fruit producers