खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत मुनगंटीवार म्हणाले...

टीम ई-सकाळ
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

सरकारची वाटचाल ही वाट लावणारी

मुंबई : माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केले. ''एकनाथ खडसे हे भाजपला सोडून जाण्याचा विचार कधीही करू शकत नाहीत. त्यांची नाराजी असेल तर ती लवकरच दूर होईल'', असे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

भाजपमधील नाराज एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी सुधीर मुनगंटीवार रवाना झाले आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, एकनाथ खडसे हे पक्षाचे आधारस्तंभ आहेत. पक्ष सोडून जाण्याचा त्यांचा विचारही नसेल. ते आमचे नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी आपले आयुष्य समर्पित केले. जर त्यांच्यात मनात याबाबत काही नाराजी असेल तर त्यांची नाराजी दूर होईल. भाजप सोडण्याचा विचार ते करू शकतच नाही. त्यांच्या नावातच एकनाथ आहे म्हणजे एकच पक्ष. 

शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

सरकारची वाटचाल ही वाट लावणारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सरकारवर टीका केली. आत्ताच्या सरकारची वाटचाल ही वाट लावणारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse will never leave BJP says Sudhir Mungantiwar