Bengal Teachers Protest : बंगालमध्ये शिक्षकांचे साखळी उपोषण; पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन, लाठीमार केल्याचा दावा
Kolkata News : एसएससी भरती घोटाळ्यामुळे नोकऱ्या गमावण्याच्या भीतीने कोलकातामध्ये शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले असून पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला जात आहे.
कोलकता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती दोषपूर्ण व भ्रष्ट असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या शिक्षकांनी गुरुवारी येथील शालेय सेवा आयोगाच्या (एसएससी) कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू केले.