CM Yogi's Announcement: शिक्षक दिनी मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा!, सर्व शिक्षकांना कॅशलेस उपचार मिळणार

Yogi government offers health benefits to educators : योगी सरकारचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी भेटवस्तूपेक्षा कमी मानला जात नाही.
Uttar Pradesh CM Yogi Adityanath announces cashless treatment scheme for all teachers on Teachers Day.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath announces cashless treatment scheme for all teachers on Teachers Day.

esakal
Updated on

Yogi Adityanath’s Teachers Day Announcement: . उत्तर प्रदेशमधील आता सर्व शिक्षकांना कॅशलेस उपचारांची सुविधा मिळणार आहे. शिक्षक दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शिक्षकांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक, अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना ही सुविधा मिळेल. तर शिक्षा मित्र, प्रशिक्षक आणि स्वयंपाकी देखील या विशेष कॅशलेस योजनेशी जोडले जाणार आहेत.

या निर्णयाचा फायदा उत्तर प्रदेशातील ९ लाख कुटुंबांना होईल. योगी सरकारचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी भेटवस्तूपेक्षा कमी मानला जात नाही. त्यांच्या सेवेच्या दृष्टीने सरकारने त्यांच्या आरोग्याबाबत हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याशिवाय येत्या काळात शिक्षा मित्र आणि प्रशिक्षकांचे मानधन वाढवण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरच येणार आहे, त्यानंतर त्यांचे मानधन वाढवले ​​जाईल, असं यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी सांगितलं आहे.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath announces cashless treatment scheme for all teachers on Teachers Day.
Anjali Damania warn Mitkari : IPS अंजना कृष्णा यांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या मिटकरींना दमानियांनी भरला दम, म्हणाल्या...

तसेच यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी राज्यातील माजी सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, पूर्वी 'बिमारू राज्य' म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेश आज भारताच्या विकासाचे इंजिन बनत आहे. ज्या राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष होत होता, त्याची आज एक मजबूत ओळख आहे आणि लोकांना त्याचा अभिमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com