शिक्षकांनी डिजिटल शिक्षणपद्धती आत्मसात करावी; राष्ट्रपतींचे आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 6 September 2020

शिक्षकांनी डिजिटल शिक्षणपद्धती आत्मसात करून त्याबद्दल विद्यार्थ्यांची रुची वाढवावी, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात देशातील ४७ शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नवी दिल्ली - शिक्षकांनी डिजिटल शिक्षणपद्धती आत्मसात करून त्याबद्दल विद्यार्थ्यांची रुची वाढवावी, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात देशातील ४७ शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये नगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे नारायण मंगलाराम आणि मुंबईतील भाभा अणुशक्ती केंद्र शाळेच्या संगीता सोहनी या महाराष्ट्रातील दोघांचा समावेश होता. दक्षिण गोव्यातील शासकीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिंधू प्रभुदेसाई यांनाही सन्मानित करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षकांनी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगला माणूस म्हणून घडविणे हेच शिक्षणाचे मुख्य अधिष्ठान असले पाहिजे, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, की शिक्षणातील डिजिटल माध्यमाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, हे कोविड-महामारीने साऱ्या जगाला दाखवून दिले. डिजिटल शिक्षणाचे कौशल्य शिक्षकांनी अधिकाधिक आत्मसात करून त्याचा प्रत्यक्ष वापर वाढविला पाहिजे. मोठी इमारत, महागडी शिक्षण साधने यामुळे कोणतीही शाळा घडत नाही तर निष्ठावंत व समर्पित शिक्षकांमुळेच त्या शाळेची ख्याती वाढते.

उद्योगस्नेही टॉप टेन राज्यात महाराष्ट्र नाहीच; शेजारी राज्य पहिल्या क्रमांकावर

कोविड काळात डिजिटल माध्यमातून शिक्षण देणे हाच प्रभावी मार्ग उरला आहे. शिक्षकांनी आपले डिजिटल कौशल्य अधिकाधिक विकसित करावे व विद्यार्थ्यांनाही त्याच माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद या वेळी म्हणाले.

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या! 

गलराम व सोहनी 
नगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक म्हणून नारायण मंगलाराम यांची ओळख आहे. त्यांनी ई-लर्निंग पद्धतीचा लक्षणीयरीत्या अवलंब केला असून शाळेतील प्रत्येक वर्ग डिजीटल केला आहे. भाभा अणुशक्ती केंद्रीय शाळा क्रमांक ४ च्या शिक्षिका संगीता सोहनी यांनी ‘हसत खेळत विज्ञान शिका,’ हा उपक्रम राबविला आहे.  

राष्ट्रनिर्माण व विद्यार्थ्यांना घडविण्यात आमच्या मेहनती शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल देश कायम त्यांचा आभारी राहील. शिक्षकांच्या अतुलनीय प्रयत्नांबद्दल त्यांना धन्यवाद. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers should adopt digital education system Presidents appeal