Crime : पोटच्या पोरीनं केला बापाचा खून, लैंगिक छळ करत असल्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

पोटच्या पोरीनं केला बापाचा खून, लैंगिक छळ करत असल्याचा आरोप

बंगळुरू : अल्पवयीन मुलीने मित्रांच्या सहाय्याने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये (Bengaluru Karnataka) घडली. तिचे वडील तिचा लैंगिक छळ (Child Physical Abused) करत होते. त्यामुळे हत्या केल्याची कबुली मुलीने पोलिसांना दिली आहे.

४५ वर्षीय दीपक हे मूळचे बिहार येथील रहिवासी आहे. ते कर्नाटकातील बंगळुरू येथे येलहंका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. पत्नी आणि दोन मुली देखील त्यांच्यासोबत राहतात. एक मुलगी खासगी महाविद्यालयात शिकते, तर दुसरी चौथ्या वर्गात शिकते. त्याला प्रत्यक्षात दोन बायका आहेत. पहिली बायको बिहारमध्ये राहते, तर दुसरी कर्नामध्ये. कर्नाटकातील पत्नीला दोन मुली आहेत. त्याने मोठ्या मुलीचा लैंगिक छळ केला होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते.

सोमवारी पहाटे दीपकचा खून केल्याचे आढळून आल्यानंतर अल्पवयीन मुलीसह तिच्या तीन अल्पवयीन मित्रांना बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी तो दारूच्या नशेत होता आणि त्याने असाच प्रकार पुन्हा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मुलीने हा प्रकार माहीत असलेल्या मित्रांना बोलावले. मित्रांनी आणखी काहीजणांसह येऊन त्याची हत्या केली. दरम्यान, पोलिस या घटनेचा तपास करत असून यामागे आणखी काही कारण असू शकते, अशी माहिती पोलिसांनी इंडिया टुडेला दिली आहे.

टॅग्स :Karnatakacrime