धक्कादायक! बलात्कार करून युवतीला पेटवले

पीटीआय
शनिवार, 14 डिसेंबर 2019

- पीडिता भाजली 90 टक्के.

बांदा (उत्तर प्रदेश) : फतेहपूर जिल्ह्यात एका युवतीवर बलात्कार करून तिला पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला. ती नव्वद टक्के भाजली असून, तिच्यावर कानपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी तिचा नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय आरोपीने ती घरी एकटी असताना तिच्यावर बलात्कार करून तिला पेटवून देण्यात आले. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि तिला तातडीने आरोग्य केंद्रात नेले.

Video : जेव्हा पंतप्रधान मोदींचा तोल जातो अन्...

प्रकृती गंभीर असल्याने तिला कानपूर रुग्णालयात हलविले. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार झाला आहे. त्या मुलीचे व आरोपीचे प्रेम संबंध होते, असे प्राथमिक तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teenager Allegedly Raped And Set On Fire In UP