
आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल तेज प्रताप यादव यांनी मोठा खुलासा केला. तेज प्रताप यादव यांचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. आता त्यांनी आपण गेल्या १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलंय. त्यांनी अनुष्का यादव नावाच्या तरुणीसोबतचा फोटोही शेअर केला आहे.