Bihar Politics: सत्तेचा मार्ग खुला झाल्यानंतर तेजस्वी यादव भाजपविरोधात आक्रमक; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejswi Yadav

सत्तेचा मार्ग खुला झाल्यानंतर तेजस्वी यादव भाजपविरोधात आक्रमक; म्हणाले...

पाटणा : भाजपच्या १६ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर अल्पमतात आलेल्या नितीश कुमार यांनीही आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण लगेचच त्यांनी महागठबंधनला नव्यानं सत्ता स्थापनेसाठी साद घातली. तेजस्वी यादव यांची भेट घेत त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. राजदसाठी अशा प्रकारे सत्तेचा मार्ग खुला झाल्यांतर तेजस्वी यादव अचानक भाजपविरोधात आक्रमक झाले असून भाजपवर सडकून टीका केली. (Tejashwi Yadav aggressive against BJP after the path to power was opened)

तेजस्वी यादव म्हणाले, प्रादेशिक पक्षांना आम्ही संपवण्याची भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली होती. भाजपला फक्त धमकावणं आणि लोकांना विकत घेणं माहितीए. आम्हाला भाजपचा अजेंडा बिहारमध्ये कदापी लागू होऊ द्यायचा नाहीए. आपल्या सर्वांना माहितीए की लालुजींनी अडवाणींचा रथ रोखला होता. आपण भाजपबाबत सौम्य धोरण कदापी घेता कामा नये. आज सर्व पक्षांनी आणि बिहार विधानसभेच्या भाजपच्या सोडून सर्व सदस्यांनी नितीशकुमार यांना आपला नेता मानलं आहे.

आमच्या पूर्वजांचा वारसा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आता हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भाजपचा एकही मित्रपक्ष राहिलेला नाही. इतिहास हेच सांगतो की, भाजपशी युती केलेल्या पक्षाला ते संपल्याशिवाय राहत नाही. हे आपण पंजाब आणि महाराष्ट्रात पाहिलंच आहे, असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.